Reliance Jio Fiber यूजर्सला आता प्रत्येक प्लॅनमध्ये मिळणार ‘दुप्पट’ डेटाचा ‘फायदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी Reliance Jio ने आपल्या ब्रॉडबँड युजर्सला डबल डेटा बेनिफीटस देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याबाबत घोषाणा केली असून Reliance Jio ने याअगोदर आपल्या सगळ्या प्रीपेड युजर्सला निवडक प्लॅनसह डबल डेटा बेनिफीटस देण्याची घोषणा केली होती. Reliance Jio Fiber च्या युजर्सला प्रत्येक प्लॅनसह ही ऑफर दिली जात आहे. Reliance Jio ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, तुम्हाला कनेक्टेड ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी आम्ही तुम्हाला डबल डेटा बेनिफीटस ऑफर करत आहोत. यावेळी कोरोना व्हायरसमुळे पूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि सगळे लोकं वर्क फ्रॉम करत आहेत. याला पाहता कंपनीने ही घोषणा केली आहे.

Jio Fiber ला मागच्या वर्षी ५ सप्टेंबरला व्यावसायिक स्वरूपात देशातील १,१०० शहरात लाँच केले गेले होते. Jio Fiber चे प्लॅन ६९९ रुपयेपासून ते ८,४९९ रु. प्रति महिना दराने उपलब्ध आहेत. यात युजर्सला १०० Mbps ते १ Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड दिले जात आहे. प्रत्येक Jio Fiber च्या युजर्सला मासिक आणि लॉंग टर्म्स मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. या प्लॅनसह युजर्सला डबल डेटा बेनिफीटस ऑफर केले जात आहे. .

Jio Fiber च्या मासिक प्रीपेड प्लॅन Bronze प्लॅनमध्ये युजर्सला १०० Mbps च्या स्पीडने २००GB डेटा ऑफर केला जात आहे. इनेग्युरल ऑफर अंतर्गत युजर्सला या प्लॅनमध्ये ५०GB अतिरिक्त डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला आता ४००GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाईल. तर ८,४९९ रु.च्या Titanium प्लॅनमध्ये युजर्सला १Gbps च्या स्पीडने १०,०००GB डेटा ऑफर केला जात आहे. नवीन ऑफर अंतर्गत युजर्सला आता २०,०००GB डेटा उपलब्ध केला जाईल. याप्रकारे कंपनी तिमाही, अर्ध-वार्षिक आणि वार्षिक योजनेतही युजर्सला याचा लाभ मिळेल.