Coronavirus Lockdown : घरी बसून कंटाळलात, तर मग WhatsApp वर ‘हा’ मजेदार गेम खेळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या घरात बसून आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने लोकांना घराबाहेर पडता येत नाही. सतत घरात बसून अनेकांना बोर होत आहे. कधी एकदा लॉकडाऊन संपतो आणि बाहेर पडतो असे झाले आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन सध्यातरी हटवला जाऊ शकेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आणखी काही दिवस तरी आपल्याला घरातच बसून रहावे लागणार आहे.

घरात बसून टीव्ही पहाणे, गाणी ऐकणे, पत्ते खेळणे हे आता बोर होत चालले आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग व व्हिडिओ कॉलिंगचा कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी निवड खास गेम्स आणले आहेत. आपण हे गेम व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या मित्रांसोबत आणि कुटूंबियांसह खेळू शकता तसेच या व्हॉट्सअ‍ॅप गेम्समुळे तुमचा कंटाळा देखील दूर होईल. चला तर मग खेळूयात व्हॉट्सअ‍ॅप गेम्स.

Antaksahri (अंताक्षरी)

अंताक्षरी हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळापैकी एक आहे. तुम्ही हा गेम व्हॉट्सअ‍ॅप वर आपल्या मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत खेळू शकता. यासाठी आपल्याला टेक्स किवा व्हॉईस रेकर्ड फीचरचा वापर करावा लागेल.

Once upon a time गेम
हा खेळ खूपच मस्त आहे. यामध्ये आपल्याला ग्रुपमध्ये Once upon a time असे लिहावे लागेल, ज्यानंतर ग्रुपमधील सर्व मेंबर्सनी 15 सेकंदात त्यापुढे एखादी ओळ लिहायची आहे. जर आपण आपला मित्रांसोबत खेळत असाल आणि त्याला तुमचे एखादे रहस्य माहित असेल तर हा खेळ खूपच मजेदार होईल.

Guess the word
हा खेळ खूप मनोरंजक आहे. ज्यामध्ये आपल्याला आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक हिंट देऊन एक शब्द लिहायचा आहे. यानंतर ग्रुपमधील इतर मेंबर्सनी हा शब्द ओळखायचा आहे.

20 Questions गेम
हा खेळ 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. यात आपणास आपल्या ग्रुपमधील सदस्यांना 20 प्रश्न विचारावे लागतील. ग्रुपमधील जो सदस्य या प्रश्नांची बरोबर उत्तरे देईल तो सदस्य विजयी घोषीत केला जातो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like