WHO चा धोक्याचा इशारा, म्हणाले – ‘या’ पध्दतीच्या निष्काळजीपणामुळं वाढतेय ‘कोरोना’ रूग्णांची संख्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी सांगितले की, अमेरिका, रशिया आणि आशियातील देशात कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत आहे. कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे आज जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

संपूर्ण जगभरातील लोकांना कोरोना व्हायरस आपल्या जाळ्यात ओढत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. संक्रमणाला रोखायचं असल्यास जगभरातील लोकांनी मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे तंतोतंत पान करणं आणि सतत हात धुण्याची सवय ठेवणं आवश्यक आहे.
सुरुवातीला अचानकपणे या सवयी आपल्याला लावून घेणे हे एक आव्हानात्मक आहे. खासकरून अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रंप यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्याचं मान्य केलं नव्हतं. नंतर त्यांनी कोरोनापासून बचावासाठी मास्कचे महत्त्व लक्षात घेत मास्क वापरण्यास सुरुवात केली त्यामुळे इतर लोकही प्रेरित झाले.

एकिकडे ट्रंप WHO चे प्रमुख चीफ टेड्रोस यांच्यावर कोरोनाशी निगडीत माहिती लपवल्याचा आरोप करत होते. आता टेड्रोस यांच्याकडून कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत ट्रंप यांचे नाव घेतले जात आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या वाढ झपाट्याने होत आहे. रशियाच्या काही भागात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. टेड्रोस यांनी सांगितले की WHO ने दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

अमेरिकेसोत ब्राजीलच्या राष्ट्रपतींही कोरोना संक्रमणापासून बचावासाठी मास्क आणि लॉकडाऊनचा विरोध केला. आता ब्राझिलमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने ब्राझिलच्या राष्ट्रपतींना दोषी मानले आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टेंसिंग यांमुळे कोरोना पासून बचाव होत नसला तरी कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो.