काय सांगता ! होय, संपावर गेलेल्या ‘या’ विभागातील 48 हजार कर्मचार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी केलं एकदाच निलंबीत

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य रस्ता परिवहन महामंडळाच्या (TSRTC) संपाला ‘अक्षम्य गुन्हा’ संबोधत महामंडळाच्या 48 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. संपावर जाणाऱ्या संघटनांशी यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही, असेही सरकारने म्हटले आहे.

TSRTC चे कामगार शनिवारी बेमुदत संपावर गेले. त्याच संध्याकाळी सहा वाजता कामावर परत येण्याचा अल्टिमेटम सरकारने त्यांना दिला. यानंतरही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यानंतर के चंद्रशेखर राव यांनी रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली.

के चंद्रशेखर राव यांनी 48,000 हून अधिक संपकरणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘सणासुदीच्या काळात संपावर जाणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे. टीएसआरटीसी आधीच 12000 कोटी रुपयांच्या मोठ्या तोट्यात चालू आहे आणि त्याचे कर्ज 5000 कोटींवर पोहोचले आहे.

कर्मचार्‍यांची मागणी काय आहे
तेलंगणा राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे 48,000 कर्मचारी त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अनिश्चित संपावर बसले होते. टीएसआरटीसीचे पूर्णपणे सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये महामंडळाची रिक्त पदे भरणे, चालक व सहकारी चालकांना रोजगाराची सुरक्षा पुरविणे, वेतनश्रेणीच्या 2017 च्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि डिझेलवरील कर रद्द करणे यांचा समावेश आहे.

टीएसआरटीसीचे कर्मचारी आणि कार्यकारी युनियन यांनी शुक्रवारी रात्रीपासून बसवर बहिष्कार टाकला आहे. तेलंगणामध्ये सुमारे 50,000 कर्मचारी काम करतात. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन सरकारने वैकल्पिक व्यवस्था केली आहे आणि अनेक ड्रायव्हर्स आणि सहकारी यांना तात्पुरते नियुक्त केले आहे.

Visit : Policenama.com