सर्वसामान्यांना झटका ! पुढच्या महिन्यापासून वाढणार TV च्या किंमती, एवढया रूपयांनी वाढू शकतात दर

नवी दिल्ली : टेलिव्हिजनच्या किमती ऑक्टोबरपासून वाढू शकतात. कारण मागच्या वर्षी ओपन सेल पॅनलवर 5% आयात शुल्क सवलत दिली होती ती या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. टेलिव्हिजन उद्योग अगोदरच दबावाखाली आहे कारण टिव्ही बनवण्यासाठी मुख्य घटक असणार्‍या पॅनलच्या किंमतीत 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

टीओआयच्या रिपोर्टनुसार हे समजले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय इम्पोर्ट ड्यूटी सवलत वाढवण्याच्या बाजूने आहे. इम्पोर्ट ड्यूटीत सवलत दिल्याने टीव्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतवणूक वाढण्यास मदत मिळाली आहे आणि याचा परिणाम म्हणून दक्षिण कोरायन कंपनी सॅमसंग व्हिएतनाममधील आपला व्यवसाय गुंडाळून भारतात उत्पादन सुरू करणार आहे. सूत्रांनुसार, अंतिम निर्णय अर्थमंत्रालयाकडून घेतला जाईल, जो सध्या गुंडाळून ठेवण्यात आला आहे.

1200-1500 रुपयांपर्यंत वाढू शकतात टीव्हीच्या किंमती
टीव्ही कंपन्यांनी टीओआयला सांगितले की, त्यांच्याकडे दर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामध्ये एलजी, पॅनासोनिक, थॉमसन आणि सॅन्सुईसारख्या कंपन्या सहभागी आहेत. यांचे म्हणणे आहे की, टीव्हीच्या किंमती सुमारे 4% किंवा 32 इंची टेलिव्हिजनसाठी किमान 600 रुपये आणि 42 इंचसाठी 1200-1500 रुपयेपर्यंत वाढतील. मोठ्या स्क्रीनसाठी सुद्धा किंमती वाढतील.