काय सांगता ! होय, संसदेत फोनवर पॉर्न पाहात होते खासदार, पकडल्यावर बनवला आश्चर्यकारक बहाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनता त्यांचे प्रतिनिधी निवडते आणि त्यांना संसदेमध्ये पाठवते जेणेकरून ते सर्वात शक्तिशाली टप्प्यावर जनतेचा आवाज उठवू शकतील, परंतु काही वेळा काही खासदार असे काहीतरी करतात की, ज्यामुळे खासदार स्वत; लज्जास्पद होतात. थायलंडच्या संसदेतही अशीच एक बाब दिसून आली आहे. येथे संसदेत बसून मोबाइलवर नग्न फोटो पाहताना एक खासदार कॅमेऱ्यात कैद झाले. नंतर यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी ते मान्य केले पण एक विचित्र कारण सांगितले.

गुरुवारी थायलंडच्या संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. सर्व खासदार अर्थसंकल्पातील कागदपत्रे पाहण्यात व्यस्त होते. त्याचवेळी खासदार रोनाथेप अनुवत फोनवर काहीतरी वेगळं करण्यात व्यस्त होते. प्रेस गॅलरीमध्ये बसलेल्या पत्रकारांनी त्यांचे फोटो घेतले आणि झूम करुन पाहिले तर त्यांना एक खासदार महिलांचे नग्न फोटो पाहत असल्याचे आढळले. यावेळी त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क देखील काढून टाकला होता. ते खूप वेळ तीन फोटोंकडे पाहत होते, ज्यामध्ये एका फोटोमध्ये टॉपलेस महिला होती आणि दुसर्‍या फोटो नग्न होऊन पलंगावर पडली होती.

नंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता सत्ताधारी पालांग प्रछाराथ पार्टीचे खासदार चोनबुरी प्रांत लज्जित झाले. तथापि, त्यांनी कबूल केले की, ते मोबाइलमध्ये नग्न फोटो पाहत आहे. परंतु पैशाची आणि मदतीची मागणी करुन कोणीतरी त्यांना फोटो पाठविल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासदार म्हणाले की, फोटोतील बॅकग्राऊंड लक्षपुर्वक पाहून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते मुलगी धोक्यात आहे का? ते मुलीच्या आसपासच्या गोष्टी पहात होते.

खासदाराने सांगितले की, ते हे फोटो काळजीपूर्वक पाहत होते कारण ती मुलगी गुंडांच्या ताब्यात असल्याची भीती त्यांना वाटली. ते म्हणाले की, ती मुलगी पैसे मागत होती अशी त्यांना जाणीव झाल्यावर त्यांनी ते फोटो मोबाईलमधून डिलीट केले. माध्यमात हे प्रकरण उपस्थित झाल्यानंतर सरकारने त्यांना जाब विचारला आहे. 2012 मध्ये बँकॉकचे खासदार नात बनतादतन यांनादेखील घटनादुरुस्ती दरम्यान पॉर्न पाहतानाही पकडले गेले होते.

भारतातही एक लाजिरवाणी घटना घडली आहे
भारतातही हा प्रकार घडला आहे. 2012 मध्ये कर्नाटक विधानसभेत दोन कॅबिनेट मंत्री स्मार्टफोनवर अश्लील चित्रपट पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. याव्यतिरिक्त 2015 मध्ये ओडिशा विधानसभेत एक आमदार अशाचप्रकारे आढळला होता.