रक्षणकर्त्या पोलिसाची आर्त हाक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अतिरेक्यांचा हल्ला असो की समाजकंटकांकडून होणारे बॉम्बस्फोट, दिवाळी, दसरा, गणपती सारखे सणांमध्ये दिवसरात्र रस्त्यावर उतरुन जनेतेचे रक्षण करण्यात व्यस्त असणाऱ्या पोलिसांचे जीवन कमालीचे त्रासदायक ठरते. त्यातूनच त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते, अशाच एका पोलीस कर्मचारी सध्या कर्करोगाशी संघर्ष करीत असून त्याच्या रक्षणासाठी आता जनतेने पुढे यावे, अशी आर्त हाक पोलिसाच्या कुटुंबाने केली आहे.

राजेश पाटोळे (वय ४४) असे या पीडित पोलिसाचे नाव असून तो पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर तैनात राहणारे पाटोळे आज कर्करोगाशी झुंज देत आहेत. रक्षणकर्त्या पाटोळे यांना कोणीतरी वाचवावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील समता नगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले राजेश पाटोळे यांना सफरीं हाडाचा केसर या आजाराने पीडित आहेत. पाटोळे याना मुलुंडच्या वोक्हार्ट फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात  आलेले आहे. पाटोळे यांची परिस्थिती पहाता त्यांचे कुटुंबियांच्या मदतीच्या अपेक्षेत आहेत.

त्यांच्या आजारावर तब्बल १० लाखाचा खर्च येणार आहे. ६० हजार रुपयांचे एक इंजेक्शन असा एक महिन्याचा कोर्स त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. हा अवाढव्य खर्च कसा आणि कोठून करायचा अशा चिंतेत पाटोळे कुटुंबिय आहेत. सहकारी आणि पोलीस कर्मचारी मित्र परिवाराने वर्गणी काढून पाटोळे यांना दीड लाख रुपयांची मदत केली आहे. पण उपचारावर होणारा खर्च लक्षात घेता पाटोळे यांना आणखी मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जनतेला आवाहन केले आहे.