‘त्या’ सयामी जुळ्यांना 10 वी च्या परीक्षेसाठी वेगवेगळं ‘हॉलतिकीट’

हैद्राबाद : वृत्तसंस्था – हैद्राबाद शिक्षण विभागाने सयामी जुळ्या वीणा व वाणी यांच्या स्वतंत्र परीक्षा देण्याच्या विनंतीला हिरवा कंदील दिला आहे. १० वीच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे या दोघीना पेपर देता येणार आहे. डोकं जुळलेल्या या दोघांनी शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे स्वतंत्र परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे. वैद्यकीयदृष्ट्या सयामी जुळे या शरीरातील अवयव जुळलेल्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. जन्म जरी जुळलेल्या स्वरुपात झाला असला तरी त्यांना स्वत:चं वेगळं अस्तित्व उभं करायची इच्छा त्यांनी शिक्षण विभागाला केलेल्या या विनंतीवर दिसून येत आहे .

नोव्हेंबर 2019 मध्ये आम्ही राज्य सरकारकडे वीणा व वाणी या केसमध्ये मार्ग दाखविण्यासाठी पत्र पाठवले होते. शेवटी वाणी आणि वीणा याना स्वतंत्रपने परीक्षेला बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या दोघींसाठी दोन वेगवेगळे प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. दोघीही परीक्षेला बसण्यासाठी खूप उत्सुक आहेत. असे हैद्राबादचे जिल्हा शिक्षण अधिकारी बी व्यंकटा नरसम्मा यांनी सांगितले आहे.

वीणा व वाणी यांची काळजी जिल्हा बाल कल्याण अधिकारी के झांशी घेत आहेत. आत्तापर्यंत शिक्षण विभागाकडून परीक्षेसंदर्भातील पत्र आलं नसल्याचं त्यांनी सांगितले. निलोफर रुग्णालयात वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत हे जुळे राहत होते. नंतर त्याच्या १२ व्या वर्षानंतर त्याना घरी पाठविण्यात आले. रिद्धी सिद्धी या सयामी जुळ्यांना मुंबईतील वाडिया रुग्णालयात 2017 मध्ये शस्त्रक्रिया करुन वेगळं करण्यात आलं होतं.

You might also like