त्या गावात  होत आहेत विहरीत  बुडवून महिलांचे खून

पारनेर : पोलीसनामा ऑनलाईन – शाळकरी मुलीचा विहरीत बुडून झालेला संशयास्पद मृत्यू  आणि त्यानंतर तशाच पध्दतीने विहरीत महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हि घटना पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ या गावी शुक्रवारी (३० नोव्हेंबर ) रोजी ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून २६ नोव्हेंबरला अशा प्रकारची पहिली घटना घडली होती. त्यात ११ वर्षाच्या चिमुरडीचा संशयास्पद मृतदेश गावाजवळील विहरीत आढळून आला होता. त्यानंतर आता त्याच गावात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

सुशीला भाऊसाहेब झराड (वय ४०)असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची पारनेर तालुक्यातील माजमपूरची रहिवासी होती परंतु गेल्या पंधरा वर्षा पासून ती राळेगण थेरपाळ या गावी राहत होती. या महिलेला पती नसल्याने ती मोलमजुरी करून आपल्या मुलांना सांभाळत करत होती. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सदर महिला शेतातून घरी आली असता. तिच्या जवळ असणाऱ्या दोन शेळ्यांपैकी एक शेळी गायब असल्याने त्या शेळीला शोधायला ती घरातून बाहेर पडली.

आपली आई का आली नाही म्हणून तिच्या मुलाने त्याच्या मित्रांसोबत आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या आईचा त्याला कोठेच तपास लागला नाही. मात्र गावा जवळच्या एका शेतातील विहरी जवळ त्याला त्याच्या आईची चप्पल, घरची पाटी ,आणि आईचे डोक्याला बांधायचे स्कार्प तसेच  छोट्या झुडपाला बांधलेली शेळी त्याला आढळून आली. ती शेळी त्याच्या घरची हरवलेली शेळी होती.घाबरलेल्या त्या मुलाने गावातील लोकांना बोलावले आणि काही जाणकार व्यक्तींनी विहरीत उड्या टाकून विहरीच्या तळाशी जाऊन हरवलेल्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तळाशी पिवळ्या रंगाचे वस्त्र दिसले. त्या मुलाला या संदर्भात विचारले असता आपल्या आईने आज पिवळी साडी घातली होती असे सांगितले. एव्हाना घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. पोलीसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेहवर काढला आणि तात्काळ उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पारनेरला पाठवला.

राळेगण थेरपाळ या गावातील हि या आठ्वड्याती दुसरी घटना असून २३ नोव्हेंबर रोजी गायब झालेल्या दिव्या कारखिले या मुलीचा मृतदेह २६ नोव्हेंबरला  विहरीमध्ये आढळून आला होता. या दोन्ही खुनांची पद्धत एकच असल्याने खूनी एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे. निघोजपोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, पोलीस हावलदार निकम पोलीस, शिवाजी कावडे आणि होमगार्ड संतोष एरोळे हे घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी हजर झाले होते. नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली नराहता सतर्क रहावे असे आवाहन पोलिसांनी केले तसेच खूनी गुन्हेगाराला आपण लवकरच पकडू असा विश्वास हि पोलीसांनी व्यक्त केला आहे.