बहिणीवर संशय घेतो म्हणून मेहुण्याकडून खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

बहिणीवर संशय घेतो, या कारणावरुन मेहुण्याने दोन साथीदाराच्या मदतीने तिच्या पतीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशिष बसवंत तडवळकर (वय २६, रा. सदानंद हाईटस, शंकरनगर, आंबेगाव, कात्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत.

भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याचा मेहुणा अमित दीपक आरडे (वय २६, रा. मार्तंड हाईटस, सहकारनगर) व अमोल वेनपूरे या दोघांना अटक केली आहे. लखन जगताप हा पळून गेला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आंबेगाव खुर्द येथील सच्चाईमाता मंदिराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

[amazon_link asins=’B0785VN91S,B07811BTY8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53d1e9b3-bbc4-11e8-9097-d378ef991666′]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आशिष तडवळकर हा चालक म्हणून काम करतो. त्याचे अमित आरडे याच्या बहिणीशी प्रेमविवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आशिषची पत्नी सारखी मोबाईलवर बोलत असते. यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली होती. मोबाईलवर इतक्या वेळ कोणाशी बोलते, असे विचारुन आशिष तिच्यावर संशय घेऊ लागला होता. त्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याने दहा दिवसांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती.

तेव्हा मंगळवारी दुपारी अमित आरडे हा अमोल वेनपूरे, लखन जगताप यांना घेऊन सच्चाईमाता मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर गेले. तेथून अमोल वायेकर याने आशिष याला फोन लावला व तुझा मेहुणा अमित हा त्याचे मित्रासोबत आला आहे. तू तेथे ये असे सांगितले. त्यानुसार आशिष तेथे गेले. तेव्हा दोघांनी त्याला हाताने मारहाण केली. अमित आरडे याने दुचाकीच्या डिकीतून कोयते काढून आणले. त्याने प्रथम आशिष याच्या डोक्यात कोयता मारला. त्यानंतर अमोल वेनपूरे याने त्याला कोयत्याने मारण्यास सुरुवात केली असता त्याचा वार चुकला व आशिष याच्या डाव्या हातावर वार बसला. लखन जगताप याने पाठीवर वार केला व ते पळून गेले.

भारतामध्ये बालमृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक

आशिष तडवळकर याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. मदने अधिक तपास करीत आहेत.