लघुशंकेला गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन 

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळच्या वेस्टर्न कोल फिल्डच्या खाणीत लघुशंकेसाठी गेलेल्या २४ वर्षांच्या तरुणीवर ४ नराधमांनी बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सध्या नागपूरात रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून, या निर्भयाची रुग्णालयात जगण्यासाठी झुंज सुरु आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb97ed37-a76f-11e8-a7e2-8d1604deaf73′]

वेस्टर्न कोल फिल्ड या सरकारी कंपनीच्या खाणीजवळ असलेल्या कार्यालयात ही तरुणी काम करीत होती.  पण या कंपनीच्या कार्यालयात शौचालयही नव्हते. तेथे काम करणाऱ्या महिलांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे बऱ्याच वेळा मागणी करुनही त्यांनी शौचालय तयार केले नाही. महिलांचा आग्रह लक्षात घेऊन शेवटी कार्यालयापासून काही अंतरावर तट्ट्यांचा आडोसा तयार करुन देण्यात आला होता.

१४ आॅगस्ट रोजी ही तरुणी लघुशंकेसाठी गेली असताना एका डायव्हर आणि त्याचा साथीदार तिचा पाठलाग करत तेथे गेले. त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आपल्या आणखी दोन साथीदारांना बोलावून घेऊन त्यांनाही बलात्कार करायला सांगितले. नराधमांच्या अत्याचाराने ही तरुणी जबर जखमी झाली होती. बराच वेळ ही तरुणी आली नसल्याने कार्यालयातील इतर महिलांनी तिचा शोध घेतला तेव्हा ती जखमी अवस्थेत पडलेली आढळून आली. तिला तातडीने नागपूरला हलविण्यात आले आहे. तब्बल दहा दिवसानंतर हा प्रकार समोर आला आहे.

नागपुरात नराधमांनी तिची अगतिकताही ओरबाडली या विचारानेच नागपूरकर भडकले आहेत. केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलांसाठी साधे शौचालयही नसल्याने हा अनर्थ घडल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.

तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्या १८ वर्षाच्या सेवेत नरधमांनी एखाद्या महिलेवर इतके अत्याचार केलेले आपण पाहिले नसल्याचे सांगितले.

या प्रकरणात माम्लेश चक्रवर्ती आणि संतोश माळी या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना अटक करण्यात आली असून अजून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.