जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरूअसताना तरुणी दगावली

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – मय्यत अनिता पवार वय 22 वर्षे हिच्यावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने मृत्युपुर्वी दिलेल्या जवाबा वरुन परभणी येथील नानालपेठ ठाण्यातील पोलीस नाईक जी.बी.गित्ते (बक्कल नंबर 634) यांनी पाथरी पोलीसात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला

मय्यत अनिता परसराम पवार हिने 27 एप्रिल रोजी विष प्राशन केल्याची घटना घडली तिला पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु तिची प्रकृती पहाता पुढील उपचारा कामी तिला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले

अनितावर उपचार सुरू असताना 28 एप्रिल रोजी 19:15 वाजता मरण पावली पाथरी पोलीसात गुन्हा नोंद झाल्याने पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के.बी . बोधगीरे हे करीत आहेत.