पंतप्रधान विमा मदतीची अनियमितता चव्हाट्यावर

मराठवाडा : पोलीसनामा ऑनलाईन –  मागील वर्षी रेणापूर तालुक्यातील काही भागात गारपीट झाली … यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं . बिटरगावच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता . तोंडाशी आलेलं पीक गेलं..बिटरगाव येथील शेतकऱ्यांनी गारपीट ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी अर्जही केला… मात्र काही शेतकऱ्यांना मदत मिळाली , तर काही शेतकरी अद्यापही मदती पासून वंचित असल्यानं विमा मिळण्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे.

कुणाच्या खात्यावर 50 हजार रुपये आले , तर कुणाच्या खात्यावर 1 लाख 22 हजार रुपये , तर कोणाच्या खात्यावर अद्याप एकही रुपया मिळालेला नाही… त्यामुळे विमा कंपनीने ह्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाची विमा मदत पुरवताना त्यात शंका उपस्थित होत आहे…  गारपीट झाली होती , त्याचा फटका सगळ्या शेतकऱ्यांना सहन करावा लागला असतानाही विमा कंपन्यांकडून अशी अनियमितता का करण्यात आली ? असा प्रश्न उपस्थित होतोय… एकाच घरातील एका व्यक्तीला पैसे आले मात्र त्याच घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या नावे असलेली शेती आणि त्यात झालेले नुकसान त्याला कसलाही मोबदला मिळालेला नाही .

विमा कंपन्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे…बिटरगाव येथील कैलास साखरे यांना 10 एकरला 1लाख 22 हजार रुपये मिळाले. एकरी 12 हजार रुपये मिळाले. तर शेजारी असलेल्या विष्णू जाधव या शेतकऱ्यांला 1 हजार रुपये पाच एकरला 5 हजार रुपये आले, अशी अनियमितता सगळ्या गावभर झाली. विनोद विश्वनाथ राऊत यांच्या नावे 1 हेक्टर 35 आर जमीन असून त्यांना 3360 रुपये मिळाले .

विमा कंपन्यांनी काही शेतकऱ्यांना जास्त पैसा तर काही शेतकऱ्यांना कमी पैसा तर काहींना दिलाच नाही … सर्व शेतकऱ्यांनी विमा भरला गारपिटीने नुकसान ही सारखाच झालं मग विमा कंपनी विमा मदत देताना भेदभाव का करतय ? असा प्रश्न उपस्थित होतोय …सरसकट नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी गावकरी करत आहेत