दीडशे रुपयाची लाच घेताना कनिष्ठ लिपिकास अटक

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन

वडील व मित्राच्या नावे कामगार प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी १५० रुपयांची लाच घेताना महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. अनिल देशमुख असे अटक करण्यात आलेल्या महापालिका कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2dd8a9d3-c984-11e8-a81f-c57e21610847′]

परभणी शहरातील एक बांधकाम कामगार तक्रारदाराला त्याचे वडील व मित्राच्या नावे कामगार प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी या कामगाराने महानगरपालिकेतील या विभागाचे काम पाहणारे कनिष्ठ लिपिक अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली. या तक्रारीची या विभागाकडून पडताळणी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने शनिवारी सकाळी मनपाच्या कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा लावण्यात आला. दुपारी १२ च्या सुमारास मनपाच्या जुनी इमारत महापालिका प्रभाग ब कार्यालय येथे कनिष्ठ लिपिक अनिल देशमुख यांनी तक्रादाराकडून १५० रुपयांची लाच मागून ती स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी कांबळे खून प्रकरण : संशयीत राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज फरार

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय लाटकर, उपअधीक्षक रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, पोह लक्ष्मण मुरकुटे, जहागीरदार, हनुमंते, सचिन बुरसूरकर, शेख मुखीद, अविनाश पवार, धबडगे, चट्टे, भालचंद्र बोके, चौधरी यांच्या पथकाने केली.

[amazon_link asins=’B00RE448IA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e7df8ee-c984-11e8-90b3-8bd59fb21f42′]

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.