सावधान ! समोर आली ‘कोरोना’ची आणखी 2 नवीन लक्षणे

पोलिसनामा ऑनलाईन – भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत असून देशात समुह संपर्काला सुरूवात झाली आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या लक्षणांमध्ये आणखी दोन लक्षणांचा समावेश केला आहे. अचानक वास व चव या दोन संवेदना नाहीशा झाल्या असतील तर व्यक्तीला कोरोनाची बाधा झालेली असू शकते.

कोरोनाची चाचणी करण्यासाठीच्या निकषांमध्ये अचानक तोंडाची चव जाणे, गंधाची जाणीव जाणे, लक्षणांचाही आता समावेश करण्यात आला आहे. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे वा दुखणे, थकवा येणे, नाक गळणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी कोरोनाची लक्षणे मानली जातात. गंभीर स्वरुपाची लक्षणे न आढळणारे अनेक रुग्ण भारतात आढळले आहेत. परंतु, त्यांची करोना चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली. अशा रुग्णांना ‘असिम्प्टमॅटिक’ अर्थात कोणतीही लक्षणे नसलेला रुग्ण म्हणून ओळखले जाते.