‘महामेट्रो’ देणार एका दिवसाचे वेतन

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्याकरिता भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे व नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाकडून मुख्यमंत्री महाराष्ट्र सहाय्यता निधी मध्ये कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एकदिवसाचे वेतन 12 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांनी आज जाहीर केले. मुख्यमंत्री निधीकरिता महा मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचा पगार मदतीच्या स्वरुपात देणार आहेत.

कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून या उपाय योजनांमध्ये आणखी वाढ केली आहे. विषाणू पसरू नये म्हणून महा मेट्रोने नागपुर येथील प्रवासी फेर्‍या 31 मार्च पर्यंत बंद ठेवल्या आहे. मेट्रो कार्यालय येथे इंफ्रारेड थर्म मीटरद्वारे कर्मचार्‍याचे थर्मल स्कॅनिंग केल्या जात आहे. कार्यालय, कार्यस्थळ आणि कामगार कॉलनी येथे वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार नियमितपणे साफ-सफाई आणि औषधीची फवारणी करून औषधी आणि सॅनिटायजर उपलब्ध करून दिले आहे. तसेच सोशल मिडीया द्वारे जनजागृती केली जात आहे. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूपासून बचावासाठी माहिती स्टेशन सूचना फलक द्वारे दिल्या जात आहे