पहिल्याचदिवशी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाने केली ‘एवढी’ कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगनच्या ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाची चर्चा खुप पसरत होती. शुक्रवारी अजय देवगनचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे. बॉलिवूडचा ऑलराउंडर असणारा अभिनेता अजय देवगनने कॉमेडी चित्रपटात काम करुन चाहत्यांना खुप हसविले आहे. हल्क्या-फुल्क्या विषयावर बनलेला अजयचा चित्रपटही चाहत्यांना पहावसा वाटतो. ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात असे काहिसे दिसून आले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट ३१०० स्क्रिनवर प्रदर्शित झाला. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या ट्विटनुसार चित्रपटाने पहिल्यादिवशी चागंली कमाई केली आहे. तरणने सांगितले की, पहिल्यादिवशी सकाळपासून ते दुपारपर्यंत लोकांची गर्दी कमी होती. मात्र, रात्रीच्या शो मध्ये गर्दी वाढली. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन नक्कीच वाढेल. शुक्रवारी चित्रपटाने १०.४१ करोड कमाई केली.

तरण पुढे म्हणाला की, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपट १४ ते १५ करोड कमाई करेल. अजय देवगन आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘दे दे प्यार दे’ चित्रपट रोमॅन्टिक आणि कॉमेडी आहे. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट चांगलाच कमाई करेल.

You might also like