धारदार शस्त्राने सपासप वार करुन पत्निचा केला खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला. ही घटना आज (शनिवार) दुपारी उघडकीस आली आहे. घटनेनंतर पती फरार झाला असून इस्लामपूर पोलीस शोध घेत आहेत.

रेणुका तुकाराम कुटे (वय-५० रा. गंगादेवी, जि. बीड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. इस्लामपूर पोलिसांनी तुकाराम कुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्‍नी रेणुका कुटे आणि पती तुकाराम कुटे यांच्यामध्ये काही कारणाने भांडण झाले. या भांडणाच्या रागात पती तुकाराम याने रेणुका यांच्या डोक्‍यात धारदार शस्‍त्राने सपासप वार केले. यामध्ये रेणुका यांचा जागिच मृत्‍यू झाला. ही घटना दुपारी उघडकीस आल्‍यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर संशयीत तुकाराम कुटे हा फरार आहे. त्याच्या विरोधात इस्लामपूर पालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like