मुंबईत आलेल्या इस्त्रायल पर्यटक महिलेच्या मृत्युचे गुढ एक वर्षानंतर उलघडले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ते दोघे मुंबई पाहण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये त्याचे भर दुपारी प्रेमाराधन सुरु होते. त्याला तिचा विरोध होता. त्यामुळे त्याचा हात नकळत तिच्या गळ्यावर पडला आणि त्यातच श्वास कोंडल्याने तिचा मृत्यु झाला. इस्त्रायली पर्यटक महिलेच्या मृत्यु प्रकरणाचे हे धक्कादायक गुढ तब्बल एक वर्षानंतर उघडकीस आले ते फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतरच. इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रियकर ओरीरॉन याकोव्ह याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca015a3c-7e80-11e8-9d56-91a36fc38327′]
मूळचा इस्रायलचा रहिवासी असलेला ओरीरॉन याकोव्ह (वय २३) हा त्याच्या २० वर्षीय प्रेयसीसोबत गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत आला होता. कुलाबा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये ते थांबले होते.  अचानक प्रेयसी हालचाल करत नसल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेयसीला रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.  कुठल्याही संशयास्पद खुणा नसल्याने तिच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले होते. तिचा मृतदेह शवविच्छेदनानंतर व्हिसेरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठवून पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद करत तपास सुरू केला. अखेर वर्षभराने व्हिसेराचा अहवाल कुलाबा पोलिसांना मिळाला. तपासात समोर आलेल्या माहितीची योग्य शहानिशा करून, समोर आलेल्या सत्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याकोव्हा हा  दुपारी एक ते पावणे दोनच्या दरम्यान प्रेयसीसोबत संभोग सुरू असताना, याकोव्हचा ताबा सुटला. तिचा नकार असतानाही, संभोगाच्या आवेगात त्याने हात तिच्या गळ्यावर ठेवला. अशात तिच्या गळ्यावर हाताने दाब दिल्यामुळे तिचा श्वास कोंडला आणि तिचा मृत्यू झाला.
भानावर आल्यानंतर त्याला प्रेयसी बेशुद्धावस्थेत दिसली. सुरुवातीला ती झोपली असल्याचा अंदाज त्याने बांधला. मात्र, बराच वेळ तिला हलवूनदेखील काहीच प्रतिसाद येत नसल्याने तो घाबरला. त्याने पोलिसांची मदत घेतली. सुरुवातीला याबाबत त्याने पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, फॉरेन्सिक अहवालानंतर त्याला पोलिसांनी उलटसुलट प्रश्न करताच, वरील घटनाक्रम उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. फॉरेन्सिक अहवाल आणि त्यावर तज्ञांकडून घेतलेल्या सल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रियकराविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.