नंदुरबार : प्राचार्याची कॉलेजमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – प्राचार्याने महाविद्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. नंदुरबार येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. एका प्राचार्य़ाने महाविद्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्राचार्य डॉ. रविंद्र शामराव चौधरी (वय 56) असे आत्महत्या केलेल्या प्राचार्याचे नाव आहे. नंदुरबार येथील जिजामाता शैक्षणिक संस्था संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील संगणक चालक तुषार कुलकर्णी हे काही कामानिमित्त शुक्रवारी (दि. 16) दुपारी महाविद्यालयात गेले होते. त्यावेळी त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौधरी हे महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यावर खोली क्रमांक 2 मध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर कुलकर्णी यांनी घटनेची माहिती संस्थेतील इतर कर्मचा-यांना दिली. उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भापकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली.

दरम्यान प्राचार्य चौधरी यांच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यात चौधरी यांनी आर्थिक फसवणूूक केल्याचा ठपला ठेवला आहे. मुंबई व नाशिक येथील व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश करणारा उल्लेख असल्याचे समजते. हे आर्थिक व्यवहार काय होते. फसवणूक नेमकी काय झाली याचा पोलीस तपास करत आहेत. प्राचार्य चौधरी हे ब-हाणपूर जिल्ह्यातील (मध्यप्रदेश) शहापूर येथील मूळ रहिवाशी होते.