विधानपरिषद निकाल जाहीर भाजप- सेनेला प्रत्येकी दोन जागा, राष्ट्रवादीला एक, तर काँग्रेसला शून्य

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूकीसाठी २१ मी रोजी मतदान झाले होते . आज या निवडणूकीचे निकाल हाती आले आहेत.

पाचपैकी दोन जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली असून दोन जागेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. कोकणात राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळवण्यात यश आले. विधान परिषदेच्या जागेवरील निकालात काँग्रेसच्या हात रिकामाच राहिला आहे. कारण काँग्रेसला पाचपैकी एकाही जागेवर यश मिळालेले नाही. अमरावतीमध्ये काँग्रेसला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. परभणी – हिंगोलीत शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना पराभूत केले. विप्लव बजोरिया यांना २५६ मते मिळाली. तर सुरेश देशमुख यांना २२१ मते पडली. परभणी-हिंगोली पाठोपाठ अमरावतीध्येही काँग्रेसला धक्का बसला. अमरावतीमध्ये भाजपच्या प्रविण पोटे यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगढीया यांना पराभूत केले. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी १७ मते मिळाली. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी ४१२ मते मिळवत विजय मिळवला. चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार रामदास अांटकर ५५० मिळवत विजय झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केले. सराफ यांना ४६२ मते पडली. कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग जागेवर राष्ट्रावादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सेनेच्या साबळेंना पराभूत केले.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा निकाल आज जाहीर झाला.तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे.

विधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल

●नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना – नरेंद्र दराडे (412 मतं)
राष्ट्रवादी – शिवाजी सहाणे (219 मतं)
#शिवसेना 193 मतांनी विजयी

●कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी – अनिकेत तटकरे (421 मतं)
शिवसेना – राजीव साबळे (221 मतं)
#राष्ट्रवादी 200 मतांनी विजयी

●परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना – विप्लव बाजोरिया (256 मतं)
काँग्रेस – सुरेश देशमुख (221 मतं)
#शिवसेना 35 मतांनी विजयी

●अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा – प्रविण पोटे-पाटील (458 मतं)
काँग्रेस – अनिल मधोगरिया (17 मतं)
#भाजप 441 मतांनी विजयी

●वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा – रामदास आंबटकर (550 मतं)
काँग्रेस – इंद्रकुमार सराफ (462 मतं)
#भाजप 88 मतांनी विजयी