मिरची पूड डोळ्यात टाकुन अज्ञात चोरट्यांनी कार चालकासह एकास लुटले

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी सोनपेठ रोडवर घडणार्‍या अपघाताचे प्रमाण वाढले असताना आता यात लुटमारीच्या घटनांची भर पडली आहे बुधवारी रात्री सोनपेठहुन लिंब्याकडे निघालेल्या व्हॅगनर कारमधील (एमएच 22 जेझेड 0015) दोघांना धामधूम व मारहाण करीत. कारचालक उत्तम मुळे व चेअरमन बाबासाहेब दळवी याच्याकडून मोबाइल फोन व सोन्याचे ब्रासलेट अंगठ्या चोरट्यांनी लंपास केल्या याबाबत पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पाथरी तालुक्यातील लिंबा येथील माजी चेअरमन बाबासाहेब दळवी व त्यांचे मेहुणे उत्तम मुळे हे सोनपेठहुन गावाकडे परतत असताना पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटा बुद्रुक व लिंब्याच्या दरम्यान एका वळणावर गाडीचा वेग कमी झाल्याने गाडी चालक उत्तम मुळे यांच्या डोळ्यात अज्ञात चोरट्यांनी मिरची पुड घालुन लुटल्याची घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

कार चालक उत्तम मुळे याच्याकडून दोन तळ्याचे सोन्याचे ब्रास लेट, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मोबाइल फोन तर लिंबा येथील माजी चेअरमन बाबासाहेब दळवी यांच्याकडुन एक सोन्याची अंगठी, मोबाइल फोन असा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. गाडीची चाबी फेकुन देऊन अज्ञात चार चोरट्यांनी पोबारा केला सदरच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.