‘किंग’ खाननं भारताच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये गायलं गाणं, मुलगा अबराम म्हणाला- ‘पप्पा बस आता खूप झालं’ ! (व्हिडीओ)


पोलिसनामा ऑनलाइन –
कोरोना व्हायरसच्या या कठिण काळात गरजवंतांसाठी बॉलिवूड पुढं आलं होतं. इंडस्ट्रीतील सेलेब्सनं रविवारी सायंकाळी I For India कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. यात अक्षय कुमार, आमिर खान, प्रियंका चोपडा, आयुष्मान खुराना, अमिताभ बच्चन सोबतच अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. सर्व कलाकारांनी त्यांच्या पद्धतीनं जनतेचं मनोरंजन केलं. या कॉन्सर्टचा शेवट शाहरुख खाननं त्याचं गाणं सब सही हो जाएगानं केला.

हे गाणं गाताना शाहरुखनं अबरामलाही त्याच्या सोबत घेतलं होतं. दोघांनी यात मस्तपैकी डान्सही केला. गाणं शेवटाला आल्यानंतर अबराम म्हणाला पप्पा बस आता खूप झालं चला. शाहरुख खान आणि लाडक्या अबरामचा व्हिडीओ आता साऱ्यांनाच आवडत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे.

शाहरुखनं उडवली त्याची खिल्ली

शाहरुखनं I For India साठी जे गाणं गायलं ते खूप मजेदार आहे. त्यात काही ओळीत तो म्हणतो, देखो टाईम कितना बुरा चल रहा है, अब ये एसआरके सिंगर बन रहा है. पहले अॅक्टींग से बनाया अब सिंगिंग से बनाएगा. छोड ना यार सब सही हो जाएगा. या व्हिडीओ दोन्ही बापलेकांना अंदाज खूप क्युट वाटत आहे.