कलीयुग ! 3 कोटींची संपत्ती हडपल्यानंतर जन्मदात्यास रस्त्यावर सोडले

पोलिसनामा ऑनलाईन – वडिलांची तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन मुलांनी वयोवृद्ध जन्मदात्यास रस्त्यावर सोडून दिल्याची संतपाजनक घटना तेलंगणामधील माधीरा गावात घडली आहे. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. वृद्ध पित्याची प्रकृती बिघडल्याने ते सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोथू माल्या यांनी मालमत्ता पोथू सुधाकर, पोथू जनार्दन व पोथू रविंदर या आपल्या तिन्ही मुलांच्या नावे करून दिली होती. त्यानंतर तिन्ही मुलांनी त्यांना रस्त्यावर सोडले. त्यानंतर आईचे सोन्या-चांदीचे दागिणे देखील घेतले. यातील एका मुलाने आईला तिच्या नावावर सहा एकर जमीन असल्याने बरोबर राहू देण्यास परवानगी दिली.पोलिसांनी व महसूल अधिकार्‍यांनी समुपदेशन करूनही तिन्ही भावडांनी वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. वृद्धाश्रमात पित्याची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माधीरा गावच्या महसूल अधिकार्‍याने या प्रकरणी कोहिडा पोलिसात लिखीत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.