लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला ; तब्बत 67.1 टक्के मतदान

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन : देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकाल येण्यास काही तास उरले आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांनी उत्साहात मतदान केले, एकूण सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये तब्बल 67.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या लोकसभेच्या मतदानापेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे.

लोकसभा 2014 च्या निवडणुकीत 543 जागांसाठी 66.44 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी अधिक मतदान झाले असून गेल्या 16 लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास मतदानाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याचे दिसून येते.

1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात कमी होती. त्यावेळी केवळ 45.67 टक्के मतदान झाले होते. नंतरच्या काळाता थोड्या बहुत प्रमाणात का होईना मतदानाची टक्केवारी वाढत गेली.

1957 मध्ये 47.74 टक्के, 1962 मध्ये 55.42 टक्के, 1967 मध्ये 61.33 टक्के, 1971 मध्ये 55.88 टक्के, 1977 मध्ये 60.49 टक्के, 1980 मध्ये 56.92 टक्के, 1984-85 मध्ये 64.01 टक्के, 1989 मध्ये 61.95 टक्के, 1991-92 मध्ये 55.88 मध्ये, 1996 मध्ये 57.94 टक्के, 1998 मध्ये 61.97 टक्के, 1999 मध्ये 59.99 टक्के, 2004 मध्ये 57.19 टक्के, 2009 मध्ये 58.19 टक्के आणि 2014 मध्ये 66.44 टक्के मतदान झाले होते.