घरात घुसून महिलांचा विनयभंग करून जबरी चोरी करणारा गजाआड

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन – घरावर पाळत ठेवून घरामध्ये एकटी महिला हेरून घरामध्ये प्रवेश करून महिलेला नग्न किंवा अर्धनग्न करून घरातील दागिने, पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हिंजवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आशिष मोहन धायगुडे (वय-३१ रा. अहीरे गाव, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

एकटी महिला घरात असणाऱ्या घरांवर चार ते पाच दिवस पाळत ठेवून महिला एकटी असताना आरोपी घरात शिरत होता. घरातील महिलेला चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने, घरातील दागिने आणि पैसे घेऊन पसार होत होता. आरोपी घरात घुसून महिलांना त्यांचे कपडे काढण्यास सांगून आरडा ओरडा केल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता. आरोपीने बावधन येथे अशाच प्रकारे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून दागिने चोरून नेले होते.

घरातील एकट्या महिलांना लुटणारा चोरटा रामनगर बावधन परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक आतिक शेख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बावधन येथील रामनगर परिसरात सापळा रचून आरोपी धायगुडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच चोरीच्या वेळी महिलांचा विनयभंग केल्याची कबुली त्याने दिली आहे. धायगुडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दत्तवाडी आणि खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख अधिकारी अनरुद्ध गिझे, एम.डी. वरूडे, सहायक पोलीस फौजदार वायबसे, पोलीस हवालदार बाळु शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, पोलीस नाईक आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, पोलीस शिपाई विकी कदम, ओम कांबळे, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडु, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, अली शेख, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like