खळबळजनक ! पुण्यातील हिल्स ग्रीन हायस्कूलच्या आवारात बदनामीकारक मजकूर लिहून चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील उंड्री परिसरातील हिल्स ग्रीन हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे कुलुप तोडून आत घुसलेल्या चोरट्याने आवारात ठिकठिकाणी बदनामीकारक मजकूर लिहून शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीवर स्प्रे पॅट मारले. त्यानंतर शाळेतील २५ हजार रुपये किंमतीचा प्रोजेक्टर चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकिस आला आहे. याप्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकऱणी शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री-पिसोळी परिसरात हिल्स ग्रीन हायस्कूल व ज्यूनीअर कॉलेज ही इंग्रजी माध्यमाची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने ती बंद होती. मध्यरात्री अज्ञाताने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलप तोडले. त्यानंतर आत घूसून शाळेतील पाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन नुकसान केले.

शाळेच्या परिसरात शाळेची बदनामी करणारा मजकूर लिहिला आणि त्यानंतर शाळेतील वर्गात असलेला २५ हजार रुपये किंमतीचे प्रोजेक्टर यंत्र अज्ञाताने चोरुन पोबारा झाला. सोमवारी सकाळी शाळा उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिला तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत. शाळेतील व्यवस्थेविरोधात अज्ञाताने बदनामीकारक मजकूर लिहीला असून पोलिसांकडून असे कृत्य करणाºयाचा शोध घेण्यात येत आहे.

Loading...
You might also like