पुण्यात भरदिवसा घरफोडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – बावधन येथे भरदिवसा सोमवारी दुपारी बारा ते पाच या वेळेत चोरट्यांनी राहत्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी स्वाती युधिष्ठिर सिंग (२९, रा. डॅपोडील अपार्टमेंट, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती आणि त्यांचे पती कामानिमित्त सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बाहेर गेले. त्यांचा फ्लॅट लॉक लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी ते तोडले. घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण आठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

स्वाती दुपारी पाचच्या सुमारास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

जुन्या वादातून तरुणाचा खुन