चोरट्यांचा शाळेतील तांदुळ, गोड्या तेलावरही डल्ला ; क्रिकेटची बॅट, वह्याही नाही सोडल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ६ डझन वह्या, तांदळाची ६ पोती, गोडेतेल्याच्या १२ पिशव्या, क्रिकेटच्या २ बॅट, गॅस शेगडी आणि सिलेंडर ही यादी एखाद्या घरातील सामानाची नाही तर पुरंदर तालुक्यातील देवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी लांबविलेल्या वस्तूंची यादी आहे.

चोरटे घरफोडी करुन घरातील मौल्यवान वस्तू, रोकड चोरुन नेतात. पण पुरंदर तालुक्यात चोरट्याने एका शाळेवर आपला मोर्चा वळविला. तेथे काही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांनी चक्क विद्यार्थ्यांच्या भोजनासाठीचे तांदुळ, गोडे तेल्याच्या पिशव्यांवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. शाळेतील वह्याही चोरट्यांनी सोडल्या नाहीत.

ही घटना पुरंदर तालुक्यातील देवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र जगन्नाथ झगडे, (वय ४५, रा. सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, देवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एकूण ७ खोल्यांपैकी ५ खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडले. त्यातील ३ एलईडी टीव्ही, सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन, सीसीटीव्हीची स्क्रिन, गॅस सिलिंडर, शेगडी चोरुन नेल्या.

या वस्तूंबरोबरच चोरट्यांनी शाळेच्या खोल्यातील ६ डझन वह्या, आपत्कालीन कीट, तांदळाची ६ पोती, गोडे तेल्याच्या १२ पिशव्या, क्रिकेटच्या २ बॅट असा सर्व मिळून ६१ हजार ७०० रुपयांच्या मालावर हात मारला आहे. ही घटना ९ जून रोजी दुपारी १२ ते दि. ११जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला. सासवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा