सांगलीत युवतीकडून सराफाची फसवणूक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी दुकानात आलेल्या तरुणीने दुकानातील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्या. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या तरुणीविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सांगली शहरातील हरभट रस्त्यावरील सिताराम पांडुरंग नार्वेकर या सराफी दुकानात मंगळवारी (दि.७) दुपारी घडला.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d75ff5cb-9beb-11e8-bb7d-b3d50afc7987′]

याबाबत सुरेश सिताराम नार्वेकर यांनी फिर्याद दिली आहे. नार्वेकर यांचे हरभट रस्त्यावर सराफी दुकान आहे. मंगळवारी दुपारी एक युवती सोन्याच्या अंगठ्या खरेदीच्या बहाण्याने त्यांच्या दुकानात आली. एक तोळ्याची एक व अर्ध्या तोळ्याचे एक वेढण अशा दोन अंगठ्या तिने पसंद केल्या. त्यानंतर त्याचे पैसे देण्यासाठी जवळपास कोठे एटीएम आहे का अशी विचारणा युवतीने नार्वेकर यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी जवळच एटीएम सेंटर असल्याचे सांगितले.

त्यानंतर ती युवती अंगठ्या हातातच ठेवून एटीएममधून पैसे काढून आणून देते असे सांगून दुकानातून निघून गेले. नार्वेकर तिच्या पाठोपाठ गेले असता. रस्त्यावर एक युवती एका मोपेडवर बसलेली दिसून आली. तिच्या गाडीवर बसून अंगठ्या घेतलेली युवती निघून गेली. नार्वेकर यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सापडल्या नाहीत. याबाबत नार्वेकर यांनी बुधवारी रात्री उशीरा सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार बिरंगे अधिक तपास करत आहेत.
[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df476cb2-9beb-11e8-8deb-37defe148905′]

चोरटी युवती सीसीटीव्हीत कैद

दरम्यान नार्वेकर यांच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने येऊन अंगठ्या घेऊन जाणारी युवती दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. ती दुसर्‍या युवतीच्या मोपेडवरून जातानाही त्यांनी पाहिले आहे. मोपेडच्या मागे नंबरप्लेट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.