..तेंव्हा महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भविष्यात महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तसेच जनतेला स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, त्याने जनता खूश होते. मात्र ती स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलतांना येत्या काळात नागपूरला जगातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा माझा निर्धार आहे. तसेच मी आवाक्याबाहेर लोकांना स्वप्ने दाखविली परंतू त्या स्वप्नांपेक्षा जास्त कामे केली. स्वप्ने कधी संपत नाहीत. एका मागोमाग एक स्वप्न पडत राहतात. यामुळे लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते. मात्र ती स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे नितीन गडकरी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला १ लाख कोटी रुपये दिले आहेत. २० हजार कोटींची बळीराजा योजना, ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण होऊनही बंद पडलेल्या १०८ प्रकल्पांना निधी दिला, प्रधानमंत्री सिंचाई प्रकल्प २६ प्रकल्पांना असे मिळून ४० हजार कोटी दिले आहेत. तर तापी-नार-नर्मदा, दमनगंगा-पिंजर या दोन नद्याजोड प्रकल्पांना ६० हजार कोटींचा निधी दिला आहे. यामुळे गोदावरी डॅम पूर्ण भरेल. यामुळे सह्याद्रीच्या पठारावरून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याला, जायकवाडी धरणाला मिळेल. जायकवाडी ८० टक्के भरणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, महाराष्ट्रात यामुळे जलस्तर वाढेल आणि २.५ पटींनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे. ५० टक्क्यांवर महाराष्ट्रामध्ये जलसिंचन जाईल तेव्हा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा दावाही त्यांनी केला.