६० सेकंदात एकदम ‘फिट’ राहण्याचे ‘हे’ ८ मार्ग

पोलीसनामा ऑनलाईन : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी रहावे असे सर्वांना वाटत असते. पण प्रत्येकडॆच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेळ असेलच असे नाही. आज आपण ६० सेकंदात शरीर निरोगी कसे ठेवायचे याच्या आठ पद्धती जाणून घेऊ या.

१. खूप पाणी प्या
आपल्या शरीराला पाण्याची खूप आवश्यकता असते. शरीरात ऊर्जा तयार होण्यासाठी तसेच चयापचय क्रिया सुरळीत सुरु राहण्यासाठी पाण्याची खूप गरजच असते. आपल्या शरीरात ७०% पाणी असते. पचन, शोषण, उत्सर्जन या शरीरातील तीन प्रक्रिया खूप महत्वाच्या आहेत. या प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी देखील पाणी खूप आवश्यक असते. त्यामुळे सुदृढ आणि चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते.

२. किचन स्पंजला ४५ सेकंद मायक्रोव्हेवमध्ये ठेवा
स्वयंपाक घरात वापरात असलेल्या किचन स्पंजवर किंवा फडक्यावर खूप घटक जिवाणू, विषाणू असू शकतात. यामुळे आपण आजारी पडू शकतो. यापासून वाचण्यासाठी किचन स्पंजला ४५ सेकंद मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. स्पन्ज मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यामुळे घातक विषाणूंचा नाश होईल.

३. राग आल्यावर २० पर्यंत मोजणी करा
जर तुम्हाला खुप राग येत असेल तर तो राग तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही. या रागामुळे तुमचा ब्लडप्रेशर वाढू शकतो. यापासून वाचण्यासाठी २० पर्यंत आकडे मोजा. यामुळे तुमचा राग नियंत्रणात येऊ शकतो.

४. चपला बूट घराच्या बाहेर काढा
घरामध्ये प्रवेश करण्याआधी चपला बूट घराच्या बाहेरच काढा. यामुळे बाहेरील घातक जंतू घरामध्ये प्रवेश करणार नाहीत.

५. शिंक आल्यानंतर हातरुमाल वापरा
शिंक आल्यानंतर हातरूमालच्या मदतीने नाक झाका. यामुळे व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी ही कृती करणे फार गरजेचे आहे.

६. जिभेची सफाई करा
दातांसोबत जिभेची सफाई करणे खूप महत्वाचे असते. काही वेळेला हवेतील जिवाणू किंवा विषाणू जिभेवर वाढतात. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

७. डोळ्यांना सांभाळा
डोळा हा आपल्या शरीराचा नाजूक आणि महत्वाचा भाग आहे. त्यामुळे डोळे नियमितपणे स्वच्छ पाहण्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे. यामुळे डोळे निरोगी राहतात. कडक उन्हापासून डोळ्याचा बचाव करण्यासाठी तुम्ही सन ग्लास वापरू शकता.

८. हात पाय धुवा
कामावरून किंवा प्रवास करून आल्यानंतर हात पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. यामुळे बाहेरील जिवाणू, विषाणूंपासून शरीराला अपाय होऊ शकणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

Loading...
You might also like