‘अमजद खान’ नावाने भाजपचे खासदार नाना पटोले यांचा फोन केला जात होता ‘टॅप’; अजित पवार म्हणाले – ‘आरोपात ‘दम’ आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2016-17 मध्ये भाजपचे खासदार असताना नाना पटोले (Nana Patole) यांचा फोन टॅप केला जात होता. नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपात दम आहे. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपाचे समर्थन केले आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे तेव्हा अमजद खान या नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात येत होता. त्यावेळी ते भाजपचे खासदार होते. आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आहे.
या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपात तथ्य आहे.

राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांचे फोन खोटी नावे देऊन टॅप केले जात होती. असेच नाना पटोले यांच्याबरोबरही घडले आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी अथवा सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर ठीक आहे. पण वैयक्तिक फायद्यासाठी असे करणे बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी आहे, असे पवार यांनी सांगितले.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : There is a fact in Nana Patole’s complaint about phone tapping. Phone taping of political leaders & public representatives was done by giving false names. It has happened in Nana Patole’s case too. 

 

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान