निर्भया प्रकरण : फाशी नंतर निर्भयाच्या आईने दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया…व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायद्यातील सर्व त्रुटीचा आधार घेत त्यांनी एक एक याचिका दाखल केली गेली. न्यायालयाने त्या सर्वांची सुनावणी घेऊन फेटाळल्या. या खटल्यामुळे कायद्यातील त्रुटी समोर आल्या. अखेर देशाच्या या मुलीला न्याय मिळाला. पण ही लढाई अजून संपलेली नाही. देशात देर है, मगर अंधेर नही, अशा शब्दात निर्भयाची आई आशादेवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निर्भयावर अत्याचार करणार्‍या चौघांना आज पहाटे अखेर फाशी देण्यात आले. आशादेवी या तिहार तुरुंगाच्या बाहेर उपस्थित होत्या. फाशी दिल्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निभर्याचे वडिल बद्रीनाथ सिंह यांनी सांगितले की, आज खर्‍या अर्थाने आपल्या मुलीला शांती मिळाली.

चौघा नराधमांना आज फाशी देणार हे निश्चित झाल्यानंतर मध्यरात्रीपासूनच तिहार तुरुंगाच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आजचा दिवस हा महिलांचा दिवस असल्याचे निर्भयाची आई आशा देवी यांनी सांगितले. देशभरातून या फाशीचे स्वागत करण्यात येत असल्याचे निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांच्या पंजाबमधील मुळ गावातूनही या निर्णयाचे स्वागत केल्याचे मेसेज आल्याचे त्यांनी सांगितले. चार वेळा वॉरंट निघालेले हे देशातील एकमात्र प्रकरण आहे. निर्भयाच्या मारेकर्‍यांना एकाच वेळी फाशी देण्याचा हा तिहार तुरुंगातलही पहिली घटना आहे.

तिहार तुरुंगाबाहेर आलेल्या लोकांनी या घटनेचे स्वागत केले़ त्यात अनेक तरुणतरुणीचा सहभाग मोठा होता़. जतंरमंतर पासून सुरु केलेल्या न्यायाच्या मागणीच्या या संघर्षाचा एक भाग पूर्ण झाला आहे़. देशातील अशाच प्रकारे ज्या महिलांवर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरु राहणार असल्याचे येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़.