थेऊर : जागतिक बालिका दिना निमित्त विविध कार्यक्रम

थेऊर – येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जागतीक बालिका दिनाच्या निमित्ताने मुलीच्या जन्माचे स्वागत करा अशा घोषणा देऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सध्या स्त्री भृण हत्या ही कायद्याने दंडनीय अपराध असला तरीही काही जणांची मानसिकता आणखी बदललेली नाही. केंद्र सरकार मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करा असे आवाहन करत आहे.जागतीक बालिका दिनाच्या निमित्ताने प्रत्येक पालकांनी आपल्या कन्येसोबत एक सेल्फी अथवा फोटो सोशल मिडियावर प्रसारित करावा असेही आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.

यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकामध्ये शोभा सरोदे, मनिषा कुंजीर, वैशाली नाईक, उषा खेंडकर, मीना कुंजीर, मनिषा चव्हाण, शकुंतला काकडे तसेच मदतनीस भागन गायकवाड, निशा हिंगणे, आशा खेंडकर, नकीता कस्बे उपस्थित होते यावेळी किशोरवयीन मुलींचे पुष्प व बिस्किट देऊन स्वागत केले तसेच स्तनदा मुलीच्या मातांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.ग्रामपंचायत सभागृहात सर्वत्र रांगोळ्या काढून मुलींचे स्वागत केले.यावेळी किशोरवयीन मलींनी आपले मनोगत व्यक्त केले