धक्‍कादायक ! हुंडयासाठी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांकडून सूनेला ‘बेदम’ मारहाण (व्हिडीओ)

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाने हुंड्यासाठी सुनेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पीडित सुनेने पुरावा म्हणून दिला आहे.

27 एप्रिल रोजी सिंधू शर्मा यांनी हैदराबादच्या सेंट्रल क्राइम स्टेशनमध्ये सासरच्या लोकांविरोधात शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने न्यायमूर्ती नूती राममोहन राव, त्यांची पत्नी नूती दुर्गा जया लक्ष्मी आणि पती नूती वसिस्ट यांच्यावर हुंड्यासाठी तिचा 4 वर्षांपासून छळ केला जात आहे असा आरोप केला आहे.

सिंधू यांचे पती नूती वसिस्ट यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जानंतर सिंधूने एक सीसीटीव्ही व्हिडिओ सार्वजनिक केला असून त्या व्हिडिओमध्ये घरातील लोक सिंधूशी वाद घालताना दिसत आहेत. तसेच तिला सासरे व पती मारहाणही करताना दिसत आहेत. तर सासू त्यांना भडकवताना दिसत आहे. यातून ती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

राममोहनराव हैदराबाद उच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश होते आणि 2016 मध्ये हैदराबाद उच्च न्यायालयातून त्यांची बदली उच्च न्यायालयात झाली. मद्रास उच्च न्यायालयाच्या सेवेत असताना ऑगस्ट 2017 मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते.

Visit – policenama.com