चोरीसाठी फ्लॅटमध्ये घुसला चोर, तिथं दारू मिळाली अन् ‘ढोसली’ इतकी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – चोरी आणि त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से अनेकदा समोर आले आहेत. अशीच एक घटना उघडकीस आली आहे, जेथे चोर चोरी करायला आला होता परंतु शॅम्पेनची बाटली पाहून त्याचे मन वळले. त्यानंतर जे झाले याचा त्याने विचार देखील केला नसेल. ही घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गिरिकुंज इमारतीतील आहे. येथे चोरीच्या उद्देशाने एका चोरट्याने एका व्यवसायिकाच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. दरम्यान, त्याची नजर तिथे ठेवलेल्या शॅम्पेनच्या बाटल्यांवर पडली. बाटल्या पाहून तो दारू पिण्यास लागला.

मद्यधुंद चोरट्याने इतकी पिली कि, तो तिथेच पिऊन बेशद्ध होऊन पडला. सकाळी घरात काम करण्यासाठी आलेल्या नोकराला दार आतून बंद असल्याचे आढळले तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा खुलासा केला. चोराने इतके मद्यपान केले की तो तेथेच पडला होता. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने संपूर्ण घटनेचे रंजक पद्धतीने वर्णन केले.

संजीव असे या चोरट्याचे नाव आहे. तो म्हणाला, की तो बाल्कनीतून व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये अवैधपणे आत गेलो, त्यानंतर चोरी करायची होती पण दारू पाहून त्याचे मन वळले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चाकूही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा देखील दाखल केला आहे.

घरी काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, शॅंपेनच्या काही बाटल्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. सकाळी चोराला पकडले असता काही बाटल्या डस्टबिनमध्ये ठेवल्या गेल्या तर काही रिकाम्या फ्रीजमध्ये ठेवल्या. याप्रकरणी आरोपीची चौकशी केली जात आहे.

You might also like