सेवानिवृत्त वन परिमंडळ अधिकाऱ्याच्या घरात लाखोंची चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे तालुक्यातील पिंपळनेर येथील नवीन वसाहतीत मोरया नगरात सोने, रोकड सह लोखोंची चोरी झाली. ही घटना काल घडली. चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोरया नगरातील सेवा निवृत्त वन परिमंडळ अधिकारी कुटूंबियासह मुंबईत गेले होते. काल चार दिवसांनी ते घरी परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी घरांच्या मागील बाजूचा लाकडी दाराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करुन ३५ तोळे सोने व ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे मोहने कुटूंबियात तारांबळ उडाली. मोहने कुटूंबियांनी लगेचच पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठत पोलीसांना चोरी झाल्याची माहिती दिली.

चोरीची माहिती मिळताच पोलीसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. फिंगर प्रिंट तज्ञांची, श्वान पथकाची मदत घेत पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहेत.