उपचारासाठी येऊन डॉक्टरला लुबाडणाऱ्यांना ‘बेड्या’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – पेशंट बनून आलेल्या चोरट्यांनी डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे मागील आठवड्यात समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अविनाश अशोक नेमाडे (वय २७, रा. मोरथ), संजय उत्तम लोखंडे (वय ४१,), अनिल लहानु दोडके (वय २२, दोघे रा. पुसद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

असा घडला होता प्रकार

डॉक्टर मदन चक्करवार हे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे राहतात. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेले होते. त्यावेळी दोन जण त्यांच्या घरी आले. त्यांनी आवाज दिला. तब्येत ठिक नसल्याचे सांगून उपचार करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉक्टरांनी घराचा दरवाजा उघ़डला. दोघे घरात आले. त्यांनी काही कळायच्या आत घरातील लाईट बंद केली आणि डॉ. चक्करवार यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यानंतर पैशांची मागणी केली.

त्यांच्या पत्नीने घाबरून जवळ असलेले १० हजार रुपये आणि अंगावरील ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांना दिला. त्यानंतर चोरटे पळू लागले. तेव्हा त्यांनी आरडा ओरडा केला तोवर चोरटे पसार झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर