सलमानची ‘ही’ गोष्ट अली अब्बास जफरला आवडत नाही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सोबत काम करायला कोणाला नाही आवडणार बरं.. सगळे त्याच्यासोबत काम करण्यात तयार असतात. सलमान नेहमी सेट वर काम एकदम आनंदाने आणि सगळ्यांशी गप्पा मस्ती करत असतो. त्याचे वागणे सर्वांसाठी प्रेरणादायी असते. पण सलमान सगळ्या बाबतीत चांगला वागतो तर मग कोणती गोष्ट सलमानची दिग्दर्शकांना आवडत नसेल ? हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

सलमान काम करताना कोणताही मानसिक ताण घेत नाही. तो नेहमी आनंदाने काम करत असतो. आणि ज्यावेळी शुटिंगला सुरुवात होते. तेव्हा तो त्याच्या भूमिकेत जातो. नुकताच दिग्दर्शक अली अब्बास जफर अली यांनी सांगितले की, सलमान सेटवर कधीच वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे मला त्याची ही गोष्ट अजिबात आवडत नाही. अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ‘टायगर जिंदा है’,‘सुलतान’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. पुन्हा एकदा यांची जोडी पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. ‘भारत’ चित्रपटाच्यानिमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे.

एका मुलाखतीत अली अब्बास जफरने त्याचा सलमान सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तेव्हा जफर यांनी सलमानच्या चांगल्या व आवडत नसलेल्या गोष्टी सांगितल्या. यांचा आगामी ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार झळकणार आहेत.