नागपूरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीच्या पत्रांनी खळबळ, बसस्टॉपवर चिटकवले ‘लेटर्स’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सवर्ण वर्गातील मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या नाही तर बॉम्बस्फोट घडवून आणू अशा आशयाचे धमकी देणारी पत्रे शहरातील काही बसस्टॉपवर सोमवारी सकाळी चिटकविलेली आढळून आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कॉम्प्यूटर टाईप करुन त्याची प्रिंट काढून ती काही मोजक्या बसस्टॉपवर ही पत्रे चिटकाविण्यात आली आहेत. पोलिसांनी ही पत्रे ताब्यात घेतली असून ती चिटकविणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

शहरातील मोजक्याच बसस्टॉपवर ही पत्रे चिटकविण्यात आली आहेत. त्यात त्यांनी शासकीय तसेच खासगी कंपन्यांना लक्ष्य केले असून त्यांनी तरुणांना नोकरी देतानाचे निकष बदलून त्यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा. असे न करणाऱ्यांना आम्ही बॉम्बस्फोट करु अशी धमकी दिली आहे.

हे तीन पानी पत्र असून ते इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे. त्यात त्यांनी आमच्याकडे बॉम्बस्फोट करण्यासाठी साहित्य आणि हल्लेखोर तयार असल्याचे धमकाविण्यात आले आहे. संपूर्ण तीन पानी पत्र कॉम्प्युटरवर तयार करुन त्याची प्रिंट काढून ती बसस्टॉपवर चिटकविण्यात आलेली आहेत. ही पत्रे कोणी चिटकविली याचा शोध पोलीस घेत असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

या पाच गोष्टींचा ‘आहारा’ त करा वापर, शरीर होईल निरोगी

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार