उपराजधानीत एकाच रात्रीत 3 खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहरात एकाच रात्रीत तीन खून झाल्याने शहर हादरून गेले आहे. खून झालेल्या व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला यांचा समावेश आहे. दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडीके कॉलेजवळ घडली असून इमरान रियाज नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला आहे. तर त्याचा मित्र आरिफ सईद हा जखमी झाला आहे. तिसरी घटना सेनापतीनगर परिसरात झाली आहे. या घटनेत अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात विकी विजय दहाट (वय-३२) यांचा खून करण्यात आला. बुधवारी (दि.२१) रात्री घडलेल्या तीन खुनामुळे खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या राजेंद्रनगर चौकात आरिफ सईद हा हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास आरिफसोबत त्याचा मित्र इमरान त्या ठिकाणी उभा होता. त्यावेळी आरोपी अक्षय करोदे आपल्या दोन साथीदारांसह त्या ठिकाणी आला. त्याने आले खरेदी केले. खरेदी केलेले आले गाडीच्या डिकीत ठेवून निघून जाताना आरिफने पैसे मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने अक्षय करोदे आणि त्याच्या साथीदारांनी आरिफवर चाकूने हल्ला करुन पळून जाऊ लागले.

दरम्यान, अरिफचा मित्र इमरान याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्या पोटात चाकू भोसकला. रक्तबंबाळ झालेल्या इमरानला नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अक्षय करोदेला रात्री उशीरा ताब्यात घेतले.

तीन तासात तीन खून
गोंडवाना चौकात प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (व-५०) यांचा खून करण्यात आल्याची घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापूर्वी दिघोरी येथील सेनापतीनगर परिसरात विक्की दहाट (वय-३२) या तरुणाचा रात्री पावणे बाराच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला. खोसला आणि दहाट खून प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नागपूरात एकाच रात्रीत तीन खून झाल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like