दुर्दैवी घटना : क्रेनचा वायररोप तुटून ३ कामगार ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विहिरीच्या खोलीकरणाच्या कामासाठी विहिरीत उतरत असताना अचानक क्रेनचा वायररोप तुटल्याने तीन कामगार ठार झाले आहेत. अकोले तालुक्यातील देवठाण शिवारात काल ही दुर्दैवी घटना घडली. सर्व मयत अकोले तालुक्यातीलच रहिवासी आहेत.

बाळासाहेब शेळके (रा. देवठाण), गणेश कदम (रा. हिवरगाव आंबरे), नवनाथ शिंदे (रा. वडगाव, लांडगा) ही मयतांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील रामहारी दगडु जोर्वेकर यांच्या देवठाण शिवारात विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरु होते. यासाठी कामगारांना विहिरीत उतरण्यासाठी क्रेनव्दारे वायररोप लावण्यात आला होता. यावेळी मजुर विहीरीची कामे करत होती.

या विहीरीचे काम सुरु असताना दुपारी मजुरांनी जेवण केले आणि विहिरीत उतरत असताना क्रेनचा अचानक वायररोप तुटला. यावेळी क्रेनच्या माडीत बसलेले हे तिघे मजूर खाली खडकावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी क्रेन मालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार