Three Pune Police personnel Suspended | पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्याकडून पोलिस चौकीत हजर नसलेल्या ‘त्या’ 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Three Pune Police personnel Suspended | मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेत तरूणीवर एका तरूणाने कोयत्याने हल्ला (Attack On Girl In Sadashiv Peth Pune) केल्याची घटना विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या (Vishrambaug Police Station) अंकित असलेल्या पेरूगेट पोलिस चौकीपासून (Perugate Police Chowki) हकेच्या अंतरावर घडली होती. या घटनेनं संपुर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. मात्र, त्यावेळी पेरू गेट पोलिस चौकीत नियुक्तीस असलेले 3 पोलिस त्यावेळी चौकीत हजर नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) यांनी त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. (Three Pune Police personnel Suspended)

पोलिस हवालदार सुनिल शांताराम ताठे (Sunil Shantaram Tathe), पोलिस अंमलदार प्रशांत प्रकाश जगदाळे (Prashant Prakash Jagdale) आणि सागर नामदेव राणे (Sagar Namdev Rane) अशी निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबनाचे आदेश बुधवारी (दि. 28) रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. तरूणीवर हल्ला केल्याप्रकरणी शंतून जाधव याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावलेली आहे. (Three Pune Police personnel Suspended)

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी चौकीत गैरहजर राहणार्‍या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी चौकीत नियुक्तीस असणारे पोलिस त्यावेळी नेमकं काय करत होते आणि कुठं गेले होते हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे पोलिस चौकीत नेमणुक असणारे पोलिस चौकीत असतात की अन्य कोठे जातात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title :  Three Pune Police personnel Suspended | IPS Sandeep Singh Gill Suspended Three Cops Of Vishrambaug Police Station Perugate Chowki

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा