home page top 1

टिकटॉक कंपनीकडून युजर्संना ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रसिद्ध टिकटॉक अ‍ॅपने शुक्रवारी आपल्याचं युजर्सला आवाहन केले आहे. युजर्सला आवाहन करताना टिकटॉकने म्हणले आहे की, आपण या अ‍ॅपचा वापर आपली काळजी घेत करावा आणि क्रिएटिवीटी दाखवण्यासाठी करावा. कंपनीने असे ही सांगितले आहे की ते त्यांच्या कम्युनिटी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओला प्रोस्ताहन देणार नाही.

टिकटॉकने केले युजर्सला आवाहन
टिकटॉक अ‍ॅपचा वापर करुन विविध करमाती करणाऱ्यांना भारतात पोलिसांनी अनेकांना अटक केली आहेत. तर काहीचे अपघात झाले आहेत. काहींना तर धोकादायक ठिकाणी असे व्हिडिओ करताना आपला जीव गमवावा लागला आहे. निवडणूक काळात प्रचारा दरम्यान न्यायालयाने बंदी घातल्याचा प्रकार ताजाच आहे. त्यानंतर आता बऱ्याच टीकेनंतर टिकटॉकने आपल्या भारतातील युजर्सला आवाहन दिले आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात टिकटॉक व्हिडिओ बनवताना अपघाताने बंदुकीची गोळी चालल्याने किशोर नामक व्यक्तीला जीव गमवावा लगाला होता. या घटनेनंतर कंपनीने लगेचच पावले उचलतं युजर्सला जपून व्हिडिओ बनवण्याचे आव्हान केले आहे. तसेच कंपनीने महाराष्ट्रात झालेल्या प्रकारावर दु:ख व्यक्त केले आहेत.

सिने जगत –
वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’
ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’
सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

Loading...
You might also like