TikTok चे CEO केविन मेयर यांचा राजीनामा, कंपनीवर अमेरिकनर बिझनेस विकण्याचा दबाव

नवी दिल्ली : टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी राजीनामा दिला आहे. न्यूज एजन्सी एएफपीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील काही आठवड्यांपासून अमेरिकेत टिकटॉक बॅन करण्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे की, एकतर कंपनीने आपला अमेरिकन बिझनेस विकावा किंवा अ‍ॅप बॅन केले जाईल.

केविन मेयर यांना चार महिने अगोदरच टिकटॉकचे सीईओ बनवण्यात आले होते. यापूर्वी ते डिजनेमध्ये टॉप एग्झिक्यूटिव्ह होते. ते म्हणाले, मागील काही आठवड्यात राजकीय वातावरण खुप बदलले आहे. जे बदल करायचे होते मी केले होते, ज्याची गरज होती, आणि ज्यासाठी मला ग्लोबल रोलमध्ये ठेवण्यात आले होते.

टिकटॉकच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी केविन मेयर यांच्या निर्णयाचा सन्मान करते. कंपनीकडून हे सांगण्यात आले की, मागील काही महिन्यात पॉलिटिकल डायनॅमिक्स बदलले आहे.

मागील काही महिन्यांपासून अमेरिकेत टिकटॉक अ‍ॅप बॅन होण्याची भिती आहे. अमेरिकन प्रेसिडन्ट डोनल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, 90 दिवसांच्या आत कंपनीने आपला अमेरिकन बिझनेस विकावा.

जर 90 दिवसात तो विकला नाही तर अ‍ॅप बॅन होईल. मात्र, नुकतेच टिकटॉकने हेदखील कन्फर्म केले आहे की, कंपनी अमेरिकन प्रेसिडन्टच्या या ऑर्डरला चॅलेंज करेल आणि त्यांच्यावर खटला दाखल करेल.

टिकटॉकचा अमेरिकन बिझनेस खरेदी करण्यासाठी सध्या मायक्रोसॉफ्ट टिकटॉकची पॅरन्ट कंपनी बायटडांससोबत चर्चा करत आहे. एवढेच नाही तर नुकताच असाही रिपोर्ट आला होता की, अमेरिकन कंपनी ओराकल सुद्धा टिकटॉकचा अमेरिकन बिझनेस खरेदी करण्यासाठी इच्छूक आहे.