क्या बात है ! फलंदाजानं मारला ‘या’ प्रकारचा ‘सिक्स’, तब्बल 60 लाख वेळा पाहिला गेला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हारयल होत असतात. विशेषतः
टिकटॉकवर अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार केले जातात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जो मुलगा आहे त्याने मारलेला शॉट काहीतरी भलताच आहे. यामध्ये फलंदाजाने मागे वळून छक्का मारला आहे. त्याचा हा शॉट पाहून त्याच्याबरोबर खेळणारे देखील आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

@shameersyam

different shot 😎 #cricketlover

♬ original sound – iqbal Kandiga – iqbal Kandiga

गोलंदाज चतुराईने फलंदाजाच्या पायाजवळ बॉल टाकतो. मात्र त्यावर फटका मारण्यासाठी हा पठ्ठ्या अँगलच बदलून टाकतो आणि मागे वळून जोरदार छक्का मारतो. त्याचा हा शॉट पाहून त्याच्या सवंगड्यांना देखील आश्चर्य वाटले आहे. ज्या टिकटॉक युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे त्याने देखील या व्हिडीओला वेगळीच धार असल्याचे म्हटले आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 6.3 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. तर 7 लाखापेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. टिकटॉकवर हा व्हिडीओ खूप प्रसिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like