Titan Smart Glasses | टायटनने लॉन्च केली ‘स्मार्ट ग्लासेस’ ! सेल्फी घेईल, कॉल देखील ऐकू शकतो आणि गाणे सुद्धा; जाणून घ्या किंमत अन् वैशिष्टे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Titan Smart Glasses | आयकेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी Titan Eye+ ने स्मार्ट चष्मा लाँच केला आहे. Titan ने Titan EyeX नावाने स्मार्ट चष्मा बाजारात आणला आहे. तुम्ही हा स्मार्ट चष्मा केवळ सनग्लासेस, चष्मा किंवा कम्प्युटर ग्लास म्हणून वापरू शकत नाही, तर त्यातून गाणीही ऐकू शकता. फोन कॉल्स ऐकू येतात. हा स्मार्ट चष्मा ऑडिओ, टच कंट्रोल आणि फिटनेस यासारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. टायटन आयएक्स स्मार्ट ग्लास स्मार्टफोनप्रमाणे क्वालकॉम प्रोसेसरद्वारे ऑपरेट होतो. (Titan Smart Glasses)

 

हा स्मार्ट चष्मा तुम्ही अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही फोनवर अ‍ॅपद्वारे कनेक्ट करू शकता. Titan EyeX स्मार्ट चष्मा खूपच हलका आहे.

 

या स्मार्ट चष्म्याची किंमत 9999 रुपये आहे. टायटनचे म्हणणे आहे की हा स्मार्ट चष्मा एका पूर्ण चार्जवर आठ तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकतो. Titan IX स्मार्ट ग्लासेस Titan Eye+ स्टोअर्स आणि Titan Eye+ वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

 

आणखी बरीच आहेत वैशिष्ट्ये
टायटनच्या मते, टायटन IX स्मार्ट चष्मा क्लिअर व्हॉईस कॅप्चर (CVC) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जो डायनॅमिक व्हॉल्यूम कंट्रोलसह स्पष्ट आवाजाची क्वालिटी देतो. जेव्हा तुम्ही हा चष्मा ऑडिओसह कनेक्ट करता तेव्हा त्याचे तंत्रज्ञान आसपासच्या आवाजानुसार आवाजाचा वेग समायोजित करते. या ब्लूटूथ आवृत्तीमध्ये 5.0 डायनॅमिक व्हॉल्यूम कंट्रोल देण्यात आला आहे. (Titan Smart Glasses)

कॉल देखील ऐकू शकतो
टायटन आयएक्स स्मार्ट ग्लासमध्ये फोन कॉलची सुविधा आहे. हा चष्मा घालून तुम्ही फोन कॉल्स घेऊ शकता. या चष्म्याच्या मदतीने तुम्ही सेल्फी देखील काढू शकाल. यामध्ये ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही तुमचा स्मार्ट चष्मा कुठेतरी विसरलात तर तुम्ही त्याचा मागोवा देखील घेऊ शकता.

 

स्मार्ट ग्लासेसची स्मार्ट वैशिष्ट्ये
टायटनच्या या स्मार्ट ग्लासेसमध्ये तुम्हाला अनेक स्मार्ट फीचर्स मिळतील. यामध्ये उत्कृष्ट ऑडिओ क्वालिटी, टच कंट्रोल, हृदयसाठी फिटनेस ट्रॅकर, व्हॉईस-अनेबल आय केयर नोटीफिकेशन्स, अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस कनेक्टिव्हिटी सुविधा दिली आहे.

 

Web Title :-  Titan Smart Glasses | titan launch titan eyex smart glass price and features

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा