दिल्ली विधानसभा : ‘दारू’ नव्हे तर ‘गांजा’नं मतदारांना ‘आमिष’ दाखवण्याचा प्रयत्न, जप्तीनं तोडले सर्व जुने रेकॉर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीत गुन्हेगारी प्रतिमा असलेल्या उमेदवारांच्या वाढत्या गर्दीमुळे निवडणुकीत मतदारांना भुरळ घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर सामग्रीचा, खासकरून नशेचा जोर मागील विक्रम मोडीत काढत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरक्षा एजन्सींनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांमधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून ही एक मोठी धक्कादायक बाब आहे.

जवळपास १३५ किलोपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त
यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत ६ जानेवारीला लागू करण्यात आलेल्या आचार संहितेनंतर पाच आठवड्यांमध्ये ३० जानेवारीपर्यंत ४२.६९ कोटी रुपये किमतीची दारू, अंमली पदार्थ आणि किमती धातू जप्त करण्यात आले आहेत. एकूण १३५ किलोपेक्षा जास्त जप्त केलेल्या अंमली पदार्थांमधील गांजाचे प्रमाण सुरक्षा यंत्रणांसाठी एक धक्कादायक बाब ठरली आहे.

सर्वात जास्त गांजाचे प्रमाण
निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर सामग्रीच्या जप्ती अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, अंमली पदार्थांचा अवैध पुरवठा निवडणुकीतील मागणीनुसार केला जातो. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत पकडण्यात आलेल्या ८३ किलोग्रॅम हेरॉईनची जागा या वेळेस गांजाने घेतली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणुकीत गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींच्या उमेदवारीचा वाढता आलेख आणि निवडणुकीत नशा आणि इतर बेकायदेशीर अंमली पदार्थांचा वाढता वापर यांचा वेगवेगळा विचार केला जाऊ नये.

या निवडणुकीत १५ टक्के उमेदवारांवर दाखल आहेत गंभीर गुन्हे
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार विधानसभा निवडणुकीत गंभीर गुन्हेगारी प्रकरणात असलेल्या उमेदवारांची टक्केवारी वर्ष २००८ मध्ये  ४ टक्क्यांवरून २०२० मध्ये १५ टक्के झाली आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत मादक पदार्थांची जप्ती मागील निवडणुकीच्या तुलनेत २१ पट जास्त झाली आहे. निवडणुकीत अवैध सामग्रीच्या जप्ती संबंधित आयोगाच्या रिपोर्टनुसार वर्ष २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जप्त करण्यात आलेली अवैध दारू, मादक पदार्थ आणि मौल्यवान धातू यांची किंमत २.४२ कोटी रुपये होती.

‘धनबल’ आणि ‘बाहुबलीं’चा वाढता आलेख
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR) या संशोधन संस्थेने शनिवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार मनी पॉवर आणि शक्तीचा आलेख सातत्याने वाढत आहे. या अहवालानुसार दिल्ली निवडणुकीतील एकूण ६७२ उमेदवारांपैकी गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या उमेदवारांची संख्या १०४ (१५ टक्के) आहे, तर २००८ मध्ये अशा उमेदवारांची संख्या चार टक्के होती जी २०१३ ला वाढून १२ टक्के झाली. २०१५ मध्ये अशा उमेदवारांची संख्या घटून ११ टक्के झाली होती.

३६ टक्के उमेदवार आहेत कोट्याधीश
त्याचप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोट्याधीश असलेल्यांची टक्केवारी देखील सतत वाढत आहे. या निवडणुकीत एकूण ३६ टक्के कोट्याधीश उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी सर्वात जास्त ८३ टक्के उमेदवार काॅंग्रेसचे, आपचे ७३ टक्के उमेदवार आणि भाजपच्या ७० टक्के उमेदवारांचा समावेश आहे. त्याच वेळी २०१५ मध्ये कोट्याधीश उमेदवारांची हिस्सेदारी ३४ टक्के होती. त्यापैकी काॅंग्रेसचे ८४ टक्के, भाजपचे ७२ टक्के आणि आपचे ६३ टक्के उमेदवार कोट्याधीश होते.