‘मास्क’ वापरण्याचा कंटाळा आलाय ? आता मास्कला पर्याय नाकातल्या ‘फिल्टर’चा , असं करतं काम !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या सध्याच्या काळात मास्क हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. यापुढेही काही महिने मास्कचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस निघत नाही तोपर्यंत मास्क वापरणं जगभरातील सर्वांना बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे मास्क वापरणे हे देखील अत्यावश्यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क हा घालणं सक्तीचं करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क सगळ्यात महत्त्वाचे आहे. मात्र, कायम मास्क घालण्याचा कंटाळा आला असेल तर नाकात घालण्यासाठी आता काही कंपन्यांनी फिल्टर्सही बाजारात आणले आहेत.

अतिशय छोट्या आकाराचे हे फिल्टर्स नाकात घातले तर प्रदुषण अ‍ॅलर्जी आणि व्हायरस पासून संरक्षण होत असा दावा या कंपनीने केला आहे. 200 ते 500 रुपया पर्यंत हे फिल्टर्स उपलब्ध असून ते ऑनलाइन विक्रीस उपलब्ध आहेत. फिल्टर्स उपलब्ध झाल्याने मास्क वापरणाऱ्यांना आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

नाकपुड्यांच्या मधून ते फिल्टर्स आत टाकावे लागतात आणि स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात. अनेक चाचण्यानंतर हे फिल्टर्स तयार करण्यात आल्याचा दावाही कंपनीने केला आहे. कोरोना व्हायरसनंतर लॉकडाऊन सुरु करण्यात आले. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले तर अनेक नव्या संधी तयार झाल्या आहेत. मास्क, पीपीटी किट, कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणारी साधणं, तात्पुरते बेड्स, व्हेंटिलेटर्स या उत्पादनांना चांगली मागणी आहे.